माझी एक गुंठा जागा आहे. मला आठ रूम बांधायचे आहेत अंदाजे किती खर्च येईल कृपया मार्गदर्शन कराल का?

१ गुंठा म्हणजे जवळपास १००० चौ फूट जागा.

प्रातिनिधिक चित्र , स्रोत : गुगल

खालील मुद्दे लक्षात घ्या -

१.फक्त एक मजली घर बांधणार असाल, तर इतक्या जागेत ८ खोल्या खुप छोट्या होतील, म्हणून माझा सल्ला असेल की २-३ मजले बांधावे.

२. पुर्ण १००० चौ फूट जागेत बांधकाम करता येणार नाही कारण आजूबाजूला आणि मागे पुढे १.५ ते २ फूट जागा सोडावी लागेल ( असे केल्याने शेजारी शांत राहतील आणि कटकट मिटेल). जागा सोडल्यावर साधारणत: ९००-९५० चौ फूट बांधकाम करता येईल.

३.आजकाल पार्कींग ची सोय असणे बंधनकारक आहे,त्यामुळे तळमजला हा अर्धा पार्कींग साठी राखून ठेवता येईल आणि उरलेल्या ५०० चौ फूट जागेत २ खोल्या काढता येतील. पुढे गरज पडल्यास खाली भाडेकरु पण ठेवू शकता.

४. पहिला मजला:

पहिल्या मजल्यावर किचन, बेडरूम आणि हॉल काढा.

किचन - २०० चौ फूट

बेडरूम - ३०० चौ फूट

हॉल - ४०० चौ फूट

वरांडा - ५० चौ फूट

वरील मोजमाप करतांना आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता.

दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आतुन पायऱ्या घ्या , हॉल मधून.

५. दुसरा मजला:

येथे १ मोठी बेडरूम आणि २ छोट्या बेडरूम अश्या ऐकून ३ खोल्या काढता येतील. वर असल्याने बाहेर एक छान मोठा वरांडा ( कपडे वाळत घालायला) आणि आत एक स्टोअर रूम पण काढू शकता.

६. स्नानगृह आणि शौचालय आपल्या सोयीनुसार पहिल्या मजल्यावर २ आणि दुसऱ्या मजल्यावर पण २ काढा. त्यात फार फार तर ५० चौ फूट जागा जाईल.

पहिला मजला:

हॉल ला संलग्नित एक स्नानगृह आणि शौचालय - २५ चौ फूट

बेडरूम ला संलग्नित एक स्नानगृह आणि शौचालय - २५ चौ फूट

दुसरा मजला :

मोठ्या बेडरूम ला संलग्नित एक स्नानगृह आणि शौचालय - २५ चौ फूट

उरलेल्या २ बेडरूम ला कॉमन असे एक स्नानगृह आणि शौचालय - २५ चौ फूट

७. इच्छा असल्यास दोन्ही बाजूंनी गॅलरी काढता येईल पण मग या खोल्यांमधून थोडी जागा वजा करावी लागेल. अश्या प्रकारे आपले ८ खोल्यांचे प्रशस्त घर तयार होईल.

८. वरील प्रकारचे घर बांधण्यासाठी जागेची किंमत सोडून निव्वळ बांधकाम करण्यासाठी २२-२५ लाख खर्च अपेक्षित ( सर्वसाधारण महानगरपालिका हद्दीत)

आणखी काही माहिती हवी असल्यास टिप्पणी करावी. आभार.[1]

तळटीपा


जरा तेथील बांधकाम नियम पहावेत ,कारण एफ एस आय ठरवून दिलेला असतो..सर्व साधारण पणे.तो.एक असतो.म्हणजे १०००/- स्क्वेअर फूट प्लाँटसाठी तेवढेच बांधकाम. कितीही मजले.बांधले तरी.करावे लागते हे माहिती करून बांधकाम आरखडा सक्षम क्षेत्रीय अधिकारी यांचेकडून मंजूर करून घ्यावा. हे पुढील अडचणीत कामी येईल.एफएसआय कधी एखाद्या ठिकाणी जास्तही मिळतो.नीट चौकशी करून योग्य क्षेत्रफळानुसार बांधकाम आराखडा ऊत्तम आर्किटेक्ट याज कडून तयार करून घ्यावा .

Comments

Popular posts from this blog

जानें स्टोर कीपर बनने के लिए क्या है योग्यता, चयन प्रक्रिया, सैलरी और कहां मिलेगी नौकरी?

Inventory Management Mein “Stock Summary Report” Aapki Madad Kaise Karta Hai

Inscription on Asoka pillar at Rummindei [Lumbini]