जुन्नर परीसर यात्रा - जिवधन-नाणेघाट्-हडसर
Skip to main content मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे. You are here: मुख्यपृष्ठ / जुन्नर परीसर यात्रा - जिवधन-नाणेघाट्-हडसर जुन्नर परीसर यात्रा - जिवधन-नाणेघाट्-हडसर Submitted by गिरीविहार on 15 March, 2010 - 00:33 बरयाच वर्षापुर्वी पावसाळ्यात नाणेघाट चा ट्रेक केला, तेव्हा जवळच असलेला जिवधन व त्याचा वानरलिंगी सुळका खुणावत होता पण वेळेच्या कमतरतेमुळे राहुन गेला होता. अचानक आसमंतच्या जिवधन-नाणेघाट-हडसर या ट्रेकच्या निमित्ताने सन्धी जुळुन आली.. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री ११.३० वाजता मुलुन्ड स्थानकाबाहेर सर्वजण जमा झालो व गोरेगाववरुन येणार्या बसची वाट पाहत बसलो. पश्चिम रेल्वेवर झालेल्या ओवरहेड वायर कटमुळे गोरेगावला बसमध्ये चढण्यार्या सर्वांना उशिर झाला अन त्यामुळे बस मुलुंडला उशिरा पोचली. रात्री साडेबारा वाजता बसमध्ये बसुन कल्याण-भिवंडी बायपासमार्गे मुरबाड मळशेजघाट रस्त्याने जुन्नरच्या दिशेने निघालो. दिवसभर काम (?) करुन थकल्यामुळे लवकरच सर्वजण झोपी गेले अन बस जिवधनच्या पायथ्याशी असलेल्या घाटघर या गावात पोचल्यावरच उठले. बस गावात पो...