माझी एक गुंठा जागा आहे. मला आठ रूम बांधायचे आहेत अंदाजे किती खर्च येईल कृपया मार्गदर्शन कराल का?
माझी एक गुंठा जागा आहे. मला आठ रूम बांधायचे आहेत अंदाजे किती खर्च येईल कृपया मार्गदर्शन कराल का? १ गुंठा म्हणजे जवळपास १००० चौ फूट जागा. प्रातिनिधिक चित्र , स्रोत : गुगल खालील मुद्दे लक्षात घ्या - १.फक्त एक मजली घर बांधणार असाल, तर इतक्या जागेत ८ खोल्या खुप छोट्या होतील, म्हणून माझा सल्ला असेल की २-३ मजले बांधावे. २. पुर्ण १००० चौ फूट जागेत बांधकाम करता येणार नाही कारण आजूबाजूला आणि मागे पुढे १.५ ते २ फूट जागा सोडावी लागेल ( असे केल्याने शेजारी शांत राहतील आणि कटकट मिटेल). जागा सोडल्यावर साधारणत: ९००-९५० चौ फूट बांधकाम करता येईल. ३.आजकाल पार्कींग ची सोय असणे बंधनकारक आहे,त्यामुळे तळमजला हा अर्धा पार्कींग साठी राखून ठेवता येईल आणि उरलेल्या ५०० चौ फूट जागेत २ खोल्या काढता येतील. पुढे गरज पडल्यास खाली भाडेकरु पण ठेवू शकता. ४. पहिला मजला: पहिल्या मजल्यावर किचन, बेडरूम आणि हॉल काढा. किचन - २०० चौ फूट बेडरूम - ३०० चौ फूट हॉल - ४०० चौ फूट वरांडा - ५० चौ फूट वरील मोजमाप करतांना आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकता. दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी आतुन पायऱ्या घ्या , हॉल मधून. ५. दुसरा मजला: येथे १ ...