माझे मत

सारेच चांगले किंवा वाईट नसतात हे तुम्हाला मान्य आहे की नाही. हे पहा गाढवे साहेब कल्पना करणे. आणि वास्तवात अनुभवणे यात जमिनो आस्मानाचा फरक आहे. चांगली धारणा असले 25 % च लोक आहेत.75 % लोक हे अन्यायग्रस्त आहेत. 25% यांनी उगाच करायला वेड लागलंय का?याचा इतका प्रसार केलाय की बस्सं भर चौकात जरी कुणाची इज्जत लुटली जात असली ना तरीही. अशीच विचारधारा षंड बनवते आहे?

वयाने खुप लहान आहे मी सर. पण खुप अनुभव घेतलेला आहे. म्हणून बाकीचे अंदाजपंचे आपआपली मते मांडतात. मी माझ्या मतांवर ठाम असतो. प्रचार प्रसाराचे, अप्प्रचाराचे सगळे धागेदोरे माहित आहेत. या अप्प्रचारातून डोळयांदेखत स्त्रियां लुटल्या जाताहेत. तेंव्हा उगाचंच कोण नासविल होय? असं म्हणणाराच खरा गुन्हेगार असतो. असं माझं स्पष्ट मत आहे?

मी मरेपर्यंत कायद्यावर विश्वास ठेवणारा आहे. ६ वर्षाच्या पोरीवर अत्याचार झाला तरीही ६० वर्षापर्यंत न्याय मिळत नाही. तेंव्हा तुम्हीच लोक कायदा गाढव आहे म्हणता मग कायदा सुस्थितीत, सुववस्थित रक्षण करणारे पोलीस यांनाही तुम्ही गाढव ठरवता काय?

सगळेच गाढव नसतात साहेब? आणि पोलीस तर आमुचे मायबाप. प्रथम न्यायालय. आम्ही डायरेक्ट कोर्टात जातच नाहीत. पाप समजतो असं जाणं. आम्ही पोलीसांवरच नितांत विश्वास ठेवतो. मग न्याय मिळवून देण्याऐवजी कोर्टात उभा करण्याचं पाप कोण करतेय? अन् ते ही उगाचच?

६० वर्षाच्या म्हातारीला न्याय मिळत नाही. मात्र जागतिक TRP मिळवलेल्या मंदिराचा प्रश्न सोडवून मर्दपणाचा आव आणणाऱ्या न्यायव्यवस्थेला विचारलात का कधी प्रश्न? आहे का तेवढं धाडस?

पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी आहे. आणि ते शेषनाग म्हणजे आम्ही बहुजन लोक, समाज होय. आम्ही प्रत्येक देवाला आम्हीच आसरा दिलेला आहे. म्हणून जगात देव दिसत आहेत.

मुले नक्षलवादी होण्याला प्रथम, मी म्हणजेच देव म्हणणारी प्रवृत्तीच जबाबदार आहे? कायदा गाढव म्हणणारी प्रवृत्ती जबाबदार आहे? इमानदार पोलीसांना मी चांगलेच ओळखतो सर. मी त्यांचा कायम ऋणी आहे की किमान याच इमानदार पोलीस अधिकारी यांचेमुळे गुन्हा आणि गुन्हेगार उघड होतो आहे.

हा फोटो त्याच एका इमानदार पोलीसांच्या कॅमेऱ्याने काढलाय असं समजा. त्या अधिकाऱ्याचं नाव सांगायला मी वेडाय का?

Comments

Popular posts from this blog

जानें स्टोर कीपर बनने के लिए क्या है योग्यता, चयन प्रक्रिया, सैलरी और कहां मिलेगी नौकरी?

Inventory Management Mein “Stock Summary Report” Aapki Madad Kaise Karta Hai

Inscription on Asoka pillar at Rummindei [Lumbini]