मंदिर वहीं बनाऐंगे...

मंदिर वहीं बनाऐंगे...


बहुजनांतला सगळा सुशिक्षीत वर्ग स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यात बिझी आहे.
बहुजणांतला अडाणी वर्ग रोजचा भाकरीचा चंद्र शोधण्यात बिझी आहे.
दोघांचा मनस्ताप सारखाच आहे. दुःखही सारखेच आहे. याचे निवारण फक्त मंदिरातच होऊ शकते. बेबडयांच्या जीवावर आर्थिक महासत्ता होणार आहे. असं पटवून दिलं जाऊ शकतं ते फक्त आपल्या देशातच.

नव्या ठोकशाहीचे स्वागत प्रत्येकानेच करायला हवे. आणि नाही केले तरी आम्हाला कांही फरक पडणार नाही. लोकशाही गेली कुच्चं खात.

बहुजन गेला उडत.

बहुजनांना शिव्या द्या हिंदूंना राग येत नाही. हिंदूना मात्र शिव्या द्या हा बहुजन अखंड भारत पेटविल्याशिवाय राहणार नाही. काय कळतंय का?

माझं आयुष्यातलं एक स्वप्न आहे. मी मराठी आहे. मला ना सैराट चित्रपट खुपच आवडतोय. आणि प्रत्येक मराठी माणसांनाही आवडणारच की.

केवढा ज्वलंत विषय मांडला._टिम नंबर एक

केवढा धंदा केलाय. -टिम नंबर दोन.

आपआपल्या टिम निवडा. यात सहभागी व्हा प्रचार करा. प्रसार करा.

आणि हो आपले मराठी हित जोपासणाऱ्या पवित्र चित्रपटाचे पुस्तक व्हायला हवे. त्याला पवित्र ग्रंथाचा दर्जा मिळविण्याचे काम माझे बरं का?
दहा वेळेस खोटं बोललं तर खरं वाटतंय ह्या येडयांना. बघू ट्राय करु.

परश्या देव , आर्चीदेवी यांचंही याच मंदिर बांधणेच्या राष्ट्रीय कार्यक्रमात मंदिर बांधणीचा प्रस्ताव मंजूर करवून घेऊ. आणि आपला हात धुऊन घेऊ. आपल्याला लॉबी उभी करायचीय.

मराठी माणसांच्या मनामनावर आर्ची देवीचं गारूड उभा करूयात. जे मानत नाहीत. त्यांना याच गरूड विमानानं वैकुंठगमन करायला पाठवूया.

आपल्या प्रिन्सबाबाचं भलं मोठ्ठं तिरुपतीसारखं मंदिर उभारुया. यात खुप इनकम आहे. कारण प्रिन्स प्युअर आपलाय ना? त्यामुळे आयेम शुअर प्युअर -प्युअर भक्त येणार म्हणजे येणार?

परश्या बहुजनांचा देव करून टाकू. त्याला लंगडया, सल्ल्यासारखी भक्त मंडळी पुजत्याल. सर्वधर्मसमभाव असं चित्र निर्माण झालं पाहिजे? वाऱ्यांवर वाऱ्या निघायला पाहिजेत.

नागराज अण्णाचं आपण आपल्या भागात मंदिर बांधू. इकडे नको. बाटवतील त्यांला. 

अहो, पण ती आपल्या जातीचे कुठेयत?

श्यू ss गप्प बैस मुर्खा... तसं म्हणू नको... आपलं करायला काय वेळ लागणारेय का?

आपण त्याला आपलं करायला दहा पिंढयांपुर्वीचा त्याचा मुळ पुरुष म्हणजे आम्हीच आहोत हे सिद्ध करुन दाखवू की?

मस्तपैकी छापू या. तुला कळत नाही हा देश आपणच चालवतोयत ते?

या देशात जोपर्यंत बेवडे, बडवे, भडवे  जोपर्यंत आहेत ना  तोपर्यंत आपणच बाप आहोत हे ध्यानात ठेव.

तेवढयात माझ्याकडून चुकून मंदिरात घंटा वाजली. शो संपला.

✍️सुमित रवि सरवदे.

Comments

Popular posts from this blog

जानें स्टोर कीपर बनने के लिए क्या है योग्यता, चयन प्रक्रिया, सैलरी और कहां मिलेगी नौकरी?

Inventory Management Mein “Stock Summary Report” Aapki Madad Kaise Karta Hai

Inscription on Asoka pillar at Rummindei [Lumbini]